Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सैराट फेमआर्ची अर्थात रिंकू राजगुरु जोतिबा च्या दर्शनाला

सैराट फेमआर्ची अर्थात रिंकू राजगुरु जोतिबा च्या दर्शनाला 




मराठमोळी अभिनेत्री 'सैराट'  फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू  सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता रिंकूने नुकतचं ज्योतिबाचं दर्शन घेतलं असून त्याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिंकू राजगुरूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसत आहे. रिंकूने व्हिडीओ शेअर करत 'चांगभलं' असं लिहिलं आहे. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं','जय मल्हारच्या नावाने चांगभलं','साधी सरळ राहणी तरीसुद्धा किती ते तेज चेहऱ्यावर' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची आईदेखील दिसत आहे. तसेच हात जोडून ती देवाला साकडं घालताना दिसत आहे. दरम्यान ती गुलालात न्हाहून गेली आहे. रिंकूच्या कोल्हापूरातील चाहत्यांनी तिचं खास स्वागत केलं आहे. तसेच आगामी प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

रिंकूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रिंकू अॅसिड व्हिक्टिमच्या भूमिकेत दिसली होती. या सिनेमासाठी तिने खास प्रोस्थेटिक मेकअप केला होता. रिंकूच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

रिंकू राजगुरूबद्दल जाणून घ्या... 

महाराष्ट्रातील सोलापूर  जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी असलेल्या रिंकूचा  चित्रपट किंवा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता. एकदा नागराज मंजुळे यांना काही कामानिमित्त सोलापूरला जावे लागले. नागराज मंजुळेसारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये रिंकूचाही समावेश होता. त्यावेळी नागराज मंजुळे त्यांच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीसाठी ग्रामीण भागातील मुलीच्या शोधात होते. रिंकू राजगुरुला पाहून त्यांना वाटले की, हीच मुलगी त्यांच्या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य आहे. लगेच घाईघाईत रिंकूचे देखील ऑडिशन घेण्यात आले आणि तिची 'सैराट' या चित्रपटासाठी निवड झाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.