Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कैलास काळे प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल जाहीर

कैलास काळे प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल जाहीर


चौकशीचा अहवाल जाहीर : रेखांकनामध्ये तो प्लॉट निश्चित दिसत नसल्यामुळे ते प्रकरण प्रलंबित : प्रस्ताव धारक  मयत झाल्याने यांच्या वारसांनी वारसपत्र दिल्यास कारवाई करू मात्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणारे शुल्क भरावे लागेल : उपायुक्त स्मृती पाटील यांची माहिती

सांगली : कैलास काळे प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्त सुनील पवार यांनी नियुक्त केलेल्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या एक सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आज जाहीर करण्यात आला आहे. चौकशी समितीच्या सदस्य तथा उपआयुक्त स्मृती पाटील यानी आज या अहवालाची माहिती दिली. 

यामध्ये तक्रारदार कैलास काळे यांचे वडील बजरंग काळे यांच्या नावे 2012 साली प्रस्ताव दाखल होता यामध्ये रेखंकानात प्लॉट निश्चिती होत नसल्याने हा प्रस्ताव प्रलंबित होता. तसेच 2014 सालीच बजरंग काळे मयत झाल्याने त्यांचा वारस ठरवून तशी माहिती महापालिकेला देणे आवश्यक होते मात्र तसे कुठेही कागदोपत्री दिसून आले नाही. त्यामूळे या प्रस्तावात बजरंग काळे त्यांच्या नंतर यांचे वारस निश्चिती करून त्याबाबत महापालिकेला कळविल्यास त्या प्रलंबित प्रस्तावाबाबत कारवाई केली जाईल आणि याचबरोबर अतिरिक्त शुल्क बाबतच्या तक्रारी बाबत शासनाचे मार्गदर्शन मागवले जाईल त्यानुसार काळे याना शुल्क भरावे लागेल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच मूळ प्रस्ताव धारक बजरंग काळे यानी 2012 मध्ये दाखल केलेल्या प्रस्तावासोबत जोडलेल्या रेखांकनामध्ये त्यांचा प्लॉटच निश्चित नसल्यामुळे तो प्रस्ताव प्रलंबित राहिलेला आहे असे समोर आले आहे. तसेच कैलास काळे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये केलेल्या अर्जनुसार त्यांना  मार्च मध्ये तसे उत्तरही देण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.