Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; केंद्राने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा

करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; केंद्राने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा


नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी केंद्रानेदेशभरातील राज्यांतील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया याच पार्श्वभूमीवर आढावा बैठकीमध्ये राज्यांना सावधतेची सूचना केली आहे.

आपत्कालीन हॉटस्पॉट निश्चित करून संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी तयारी करण्यात यावी असे मंडाविया यांनी सांगितले. या व्हर्च्युअल बैठकीमध्ये विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिव सहभागी झाले होते. हिवताप, श्वसनविकाराचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन आपत्कालीन हॉटस्पॉट निश्चित केले जावेत. चाचण्या आणि लसीकरण वाढविण्यात यावे तसेच रुग्णालयांतील सोयी सुविधाही सज्ज ठेवण्यात याव्यात असे सांगण्यात आले.

पॉझिटिव्ह नमुन्यांचा जनुकीय आराखडा निश्चित केला जावा तसेच कोरोना नियमांच्या पालनाबाबत लोकांमध्ये जाणीवजागृती करण्यात यावी अशी सूचनाही या बैठकीमध्ये करण्यात आली. केंद्र आणि राज्यांनी सहकार्य आणि समन्वयाच्या भावनेतून काम करणे गरजेचे आहे. याआधी देशात कोरोनाचे रुग्ण वाढले असताना ज्या पद्धतीने काम करण्यात आले त्या एकजुटीने आता काम करणे गरजेचे आहे, असे मंडाविया म्हणाले.

येत्या सोमवारी आणि अकरा रोजी रुग्णालयांतील पायाभूत सुविधांची मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम घेण्यात घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आरोग्यविषयक तयारीचा आढावाही घेतला जाईल यासाठी आज आणि उद्या रोजी बैठका घेतल्या जाणार आहेत. करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असली तरीसुद्धा रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या मात्र तुलनेने कमीच असल्याचे दिसून आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.