पत्रकारितेच्या कोर्स करणाऱ्या महिलेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल
मुंबई: कफ परेड पोलिसांनी 24 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत पांडे असे आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले कफ परेड पोलीस ठाण्यात आयपीसी कलम- 376(2)(n),354(D),323,506,509 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी ही पत्रकारीता कोर्सच्या पहिल्या वर्षात असून मुंबईचा एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
पीडित महिलेने आरोप केला आहे की, आरोपी प्रशांत पांडे यांने तिच्याशी मैत्री करून एका हॉटेलमध्ये नेलं. त्या ठिकाणी तिला दिलेल्या पेयात गुंगी येणारा पदार्थ टाकून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या घटनेचा अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढला. त्यानंतर तिचा सदरचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना तसेच इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले.शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकाऊन घेऊन तो तोडला. तसेच आता तिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे नसतानादेखील तो फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंग खाली आणि ती शिक्षण घेत असलेल्या कॉलेज जवळ येऊन तिचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार विविध मोबाईल फोनवरून कॉल करून मानसिक त्रास देत असल्याचीही तक्रार फिर्यादीने केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.