दुचाकी चोरणारा नागजचा आंतरजिल्हा चोरटा जेरबंद
सांगली, ता. 15 : सांगलीसह, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या करण मोहन चव्हाण (वय 26, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ,जि. सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या. अधिक माहिती अशी, जिल्हयातील दुचाकी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी गुन्हे उअन्वेषणच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.
गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तपास करत असताना अंमलदार सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गीतम कांबळे यांना संशयित करण चव्हाण हा चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी धामणी चौक, सांगली येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सापळा लावून करणला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यावर विलींग्डन कॉलेजचे पाठीमागील कॉलनीमधुन चोरी केल्याचे सांगितले. त्याचबरोबर ठाणे शहर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर शहर व सांगली येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नागज येथील पत्र्याचे शेडमध्ये लपवून ठेवलेल्या आणखी सात दुचाकी जप्त केल्या. मोटार सायकल मिळून आल्या. सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून त्याची एकुण किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे.
करण हा पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आला आहे. त्याला विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे. गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे तसेच सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे, संदीप पाटील, आमसिध्द खोत, राजु शिरोळकर, विक्रम खोत, आर्यन देशिंगकर, अजय बेद्रे, गोवर्धन कुंभार, विनायक सनदी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
