Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवऱ्यासमोरच सावकाराने केला अत्याचार; खाजगी सावकाराच्या कृत्याने पुणे हादरले

नवऱ्यासमोरच सावकाराने केला अत्याचार; खाजगी सावकाराच्या कृत्याने पुणे हादरले 


पुणे: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खासगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार केलाय. इतकच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला.

पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. एका 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. 

या संपूर्ण घटनेचा आरोपीने मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.