राज्यातील विदारक दृश्य, बाईकवर खाट अडकवून निघाली अत्यंयात्रा
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अति दुर्गम भागातील तरुणाचा क्षयरोगाने मृत्यु झाला. मात्र गावापर्यंत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णवाहीकाच न मिळाल्याने खाटेवर मृतदेह टाकुन खाट मोटरसायकलला बांधुन नेण्यात आली.
क्षयरोगानं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव गणेश तेलामी होतं. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यु झाला. मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठी कुटुंबियांनी रुग्णवाहीकेसाठी शोध घेतला मात्र वेळेवर रुग्णवाहीकाच उपलब्ध झाली नाही म्हणून शेवटी त्यांनीखाटेवर मृतदेह टाकून नेला. अतिदुर्गम भागातील हे चित्र कधी बदलणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.