Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार,  पुण्यातील  धक्कादायक प्रकार; आरोपीला अटक 


पुणे : अल्पवयीन मुलीला घरी नेहून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी प्रमोद महादेव ठोबळे (वय २८) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. याबाबत खडक पोलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.

पिडीत मुलगी व आरोपी एकमेकांना ओळखतात. दरम्यान, ही मुलगी थांबलेली असताना तिला प्रमोद याने त्याच्या घरी नेले. त्याच्या घरी कोणीही नव्हते. याचाच फायदा घेऊन त्याने शारिरीक छेडछाड केली. तसेच, तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. यातून मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर हा प्रकार समोर आला. मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.