राजस्थानी कावड यात्रा ऊसाहात संपन्न
श्रावण महिना हा सण समारंभाचा महिना. या महिन्यातील सोमवारी भगवान महादेवास जल अभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. हरिद्वार येथे भगवान महादेवास नदीच्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्यासाठी यात्रेकरू कावडीने जल घेऊन पायी जातात त्यास कावड यात्रा म्हणतात.
सांगली शहरामध्ये गेली सतरा वर्षे अत्यंत उत्तम स्वरूपात अशी कावड यात्रा आयोजित केली जाते. सांगली शहरातील वखारभागातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर ते हरिपूर येथील भगवान महादेवाचे संगमेश्वर मंदिर पर्यंत ही कावड यात्रा पायी जाते. तेथे या यात्रे मधील भाविकांनी आपल्या खांद्यावरून कावडीने आणलेल्या पवित्र जलाने भगवान महादेवास अभिषेक केला जातो.यावर्षी सोमवार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी कावड यात्रेचे भव्य आयोजन केले गेले. सांगली माधवनगर मिरज व जयसिंगपूर येथील राजस्थानी भाविकांनी या यात्रेत बहुसंख्येने भाग घेतला होता. सुंदर रमणीय व भजन कीर्तनाने धार्मिक अशा वातावरणामध्ये हा सोहळा श्री लक्ष्मीनारायण मंदिर, सांगली पासून सुरू झाला. सांगलीतील गणपती पेठ, कापड पेठ, मारुती रोड मार्गे हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरापर्यंत खांद्यावर कावड व पायी चालत अशी ही यात्रा संपन्न झाली. तेथे प्रत्येकाने कावडीच्या पवित्र जलाने भगवान महादेवास जलाभिषेक केला. याचे सुंदर आयोजन समस्त राजस्थानी समाज सांगली माधवनगर मिरज व जयसिंगपूर यांनी केले.
या कावड यात्रेमध्ये सर्वस्वी मनोहर सारडा, संजय बजाज, संजय सारडा, मनोज मालाणी, उमेश बगाडिया, नंदकिशोर मंत्री, अनिल मानधना, हरीकांत बियाणी, शैलेंद्र बजाज, मनमोहन कासट, कन्हैया बलदवा, रामनिवास बजाज, श्यामसुंदर तोष्णीवाल, सुरेंद्र मालाणी, मुकुंद मालू, कुशल बजाज, श्रीकांत मर्दा, सौ.आशा झंवर, तसेच सर्व राजस्थानी महिला व पुरुष समाज सहभागी झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.