Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना; Rabies ची लागण झालेली मुलगी मृत्यूपूर्वी 40 जणांना चावली

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना; Rabies ची लागण झालेली मुलगी मृत्यूपूर्वी 40 जणांना चावली

उत्तर प्रदेशामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. अडीज वर्षाच्या मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर ही मुलगी देखील मृत्यूपूर्वी 40 जणांना चावली. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही मुलगी मामाकडे राहत होती. तेथे तिला कुत्रा चावला. ही घटना 15 दिवसांपूर्वीची कोंच तहसीलच्या क्योलारी गावातील आहे.

कुत्रा चावल्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये मुलगी सुमारे 40 जणांना चावली. मुलीला चावा घेतल्यानंतर कुत्र्याचा मृत्यू झाला होता. मुलीला कुत्रा चावल्यानंतरही तिच्या कुटुंबियांनी डॉक्टर कडे जाण्याऐवजी तिला ढोंगी वैद्याकडे नेले. घरी आणल्यानंतर ही मुलगी रेबिजची लक्षणं दाखवू लागली. मात्र कुटुंबियांनी त्याकडेही दुर्लक्ष केले.

मुलगी नंतर सुमारे 40 जणांना चावली किंवा त्यांच्यावर ओरखडे मारून गेली. शुक्रवारी ही मुलगी कोसळली. त्यानंतर तिला कुटुंबियांनी नजिकच्या रूग्नालयात नेले. तेथून मुलीला झांसी ला दुसर्‍या हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले. यामध्ये सोमवारी तिचा मृत्यू झाला

CHC in-charge Dinesh Bardariya यांनी दिलेल्या माहितीनुसार, Kyolari गावातील सुमारे 40 जण रेबिजच्या लसीसाठी आले आहेत. सध्या घाबरण्याची गरज नाही. गावात पुरेसा लसीचा साठा असल्याचं त्यांनी स्थानिकांना सांगितलं आहे.

रेबिज हा कुत्र्यच्या लाळेतून पसरणारा आजार आहे. रेबिज झालेला कुत्रा किंवा अन्य प्राणी माणसाला चावल्यास त्यांनाही हा आजार होऊ शकतो. हा आजार प्राणघातक असल्याने वेळीक वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. सामान्यतः कुत्रा चावल्यानंतर 90-175 दिवसांतही त्याची लक्षणं दिसू शकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.