Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘ माझी माती, माझा देश’अभियानदेश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता सह विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणत साजरा करण्याचे मा आयुक्त श्री सुनील पवार यांचे आवाहन

‘माझी माती, माझा देश’अभियानदेश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता सह विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणत साजरा करण्याचे मा आयुक्त श्री सुनील पवार यांचे आवाहन


‘माझी माती, माझा देश’अभियान देश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता सह विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणत साजरा करण्याचे मा आयुक्त श्री सुनील पवार यांचे आवाहन देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे.


 आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांना योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘ *मेरी मिट्टी मेरा देश’* अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे.
 त्यानिमित्त आपल्या देशात व राज्यासहित , *सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.* या उपक्रमात अधिकाधिक लोकसहभाग असावा यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09  ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘ *मिट्टी को नमन, वीरों का वंदन* ’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी - मेरा देश’ अर्थात ‘माझी माती - माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकास्तर  वर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत.

देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. दि ९/८/२०२३रोजी मनपा क्षेत्रात सर्व शाळा ,विद्यालय, शासकीय कार्यालये या मध्ये   सकाळी १०-००वाजता *पंच प्रण प्रतिज्ञा,* घेण्यात येणार आहे .

वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शाळा ,विद्यालयात  उभारले जाणार आहेत. दिनांक 9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, 'मेरी माटी - मेरा देश' मोहिनेत स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

दिल्लीत 'अमृत वाटिका' तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार असून ही 'अमृत वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारत' या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक या संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत.

या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे.  स्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवी काळात देशाने अनेक बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे. आता विकसित देश बनण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे या देशासाठी योगदान, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, समृद्ध वारशाचा अभिमान, एकता आणि बंधुता टिकवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यां प्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित पंचप्रण प्रतिज्ञा या उपक्रमात घेण्यात येणार आहे.

आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावर अधिकाधिक लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.

तीन टप्प्यात हा उपक्रम महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 9 ऑगस्ट रोजी  महापालिका क्षेत्रात शाळा ,विद्यालय , येथे सकाळी८-३० वाजता  पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे, सर्व नोडल अधिकारी मुख्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थितीत होत आहे. त्याचबरोबर, याच दिवशी सकाळी 10 वाजता सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका , मुख्यालयाच्या प्रागणात   सर्व अधिकारी –कर्मचारी हे या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.


शिलाफलक:
संस्मरणीय ३ ठिकाणी ( शाळा .) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, मा. प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, शहराचे नाव दिनांक याबाबी नमुद केल्या जाणार आहेत. 

स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन –
मनपा क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. 

वसुधा वंदन:
यामध्ये मनपा क्षेत्रातील मिरज येथील गजानन कॉलनी , माधवनगर रोड लगत  एक  जागा निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. वन विभागाच्या समन्वयातूीन स्थानिक पातळीवर ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

पंचप्रण (शपथ) घेणे:
देशाला विकसित बनवण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठी  ही प्रतिज्ञा घेतली  आहे. ‘भारताला विकसित देश बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) यावेळी घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, स्वयं सहाय्यता महिला बचत गट, सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविदयालयातील विदयार्थी, विदयार्थिनी व शिक्षक वृंद, महापालिका स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेतली आहे.

या कार्यक्रमास माआयुत श्री सुनील पवार , उप आयुक्त राहुल रोकडे , श्रीमती स्मूर्ती  पाटील , मा सभागृह नेता श्रीमती भारतीताई दिगडे  प्रशासकीय अधिकारी, श्री माकणापुरे, सहा आयुक्त , श्री कावढे,  नगरसचिव श्री चंद्रकांत आडके,  सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, नगर अभियंता श्री पांडव ,श्री हळकुंडे उद्यान अधीक्षक श्री गिरीश पाठक,   सर्व कर्मचारी  अधिकारी ,  जन संपर्क अधिकारी श्री धनंजय हर्षद उपस्थितीत होते , 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.