सांगली नगर भूमापन कार्यालयात नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार...
सांगली नगर भूमापन कार्यालयाने अचानकपणे लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. बाहेरील बाजूस फक्त एक कागद चिकटवून येणाऱ्या सर्व नागरिकांना विनाकारण त्रास देणे सुरू आहे.
• बाहेरील बाजूस चिकटविण्यात आलेल्या कागदावर कोणताही शिक्का अगर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी सही केलेली नाही आणि प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.• आंदोलन सुरू आहे असे जनतेला सांगितले जात आहे. परंतु सर्व अधिकारी हजर राहून स्वतःचा पगार मात्र सुरू आहे.• आंदोलन कधी पासून आहे याबद्दल कोणतीही तारीख लिहिलेली नाही.• ज्या कारणासाठी आंदोलन केले जात आहे तो प्रकार तासगांव येथे घडलेला आहे आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे समजते.• अशाप्रकारे अचानक आंदोलन सुरू करून जनतेची पिळवणूक करणे व स्वतः हजर राहून जनतेने भरलेल्या करातून पगार मात्र सुरू ठेवणे हे पूर्णपणे गैर आहे.
तरी या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी करून सांगली नगर भूमापन कार्यालयातील संबंधित सर्व अधिकारी यांचेवर कडक कारवाई करावी अशी समस्त नागरिकांकडून मागणी होत आहे याची दखल
मा. पालकमंत्री. सांगली जिल्हा.
मा. जिल्हाधिकारी. सांगली
मा. खासदार. सांगली.
मा. आमदार. सांगली.
यांनी तातडीने घेणे आवश्यक आहे. अन्यथा सांगली नगर भूमापन कार्यालयाचे विरोधात सर्व पक्ष व सामाजिक संघटना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.