Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या कॅम्परमधून पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या कॅम्परमधून पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण


शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या कॅम्परमधून पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणानंतर सदर शिक्षकालाही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानच्या भरतपूर येतील सरकारी शाळेत इयता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली आहे. येथील राजकीय उच्च प्राथमिक विद्यालयात पीडित विद्यार्थी शिकतो. त्याला तहान लागल्याने त्याने शाळेतील पाण्याच्या टाकीतून पाणी घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, टाकी रिकामी असल्याने त्याने शिक्षकांच्या खोलीत असलेल्या पाण्याच्या कँपरमधून पाणी घेतल. 

हा प्रकार समजल्यानंतर गंगाराम गुर्जर नावाच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करायला सुरुवात केली. या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारण्यात आलं. त्यात विद्यार्थ्याच्या पाठीला मार लागला. मुलाने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि काही ग्रामस्थ दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. या प्रकाराची कुणकुण लागलेले पोलीसही शाळेत दाखल झाले. दरम्यान, दलित समुदायातील काहींनी गंगाराम गुर्जर याला मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी गुर्जर याची सुटका केली आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं.



पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या जबाबानुसार, 8 सप्टेंबर रोजी प्रार्थना संपल्यानंतर वर्गाची सफाई करण्याचं काम त्याच्यावर होतं. सफाई केल्यानंतर त्याला तहान लागली. शाळेच्या पाण्याची टाकी रिकामी असल्याने त्याने शिक्षकांसाठी आलेल्या पाण्याच्या कँपरमधील पाणी प्यायलं. गंभीर म्हणजे, यापूर्वी तीन विद्यार्थ्यांनी त्यातून पाणी प्यायलं होतं. ही बाब कळल्यानंतर गुर्जर यांनी सगळ्यांना त्यांची जात विचारली. मात्र, आधीचे तिन्ही विद्यार्थी उच्चवर्णीय असल्याने त्यांना ओरडा पडला नाही. आपली जात कळताच त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली, असं पीडिताचं म्हणणं आहे. गुर्जर याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.