Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नापूर्वी पतीने एच आय व्ही असल्याचे लपवले, पत्नीला पॉझिटीव्ह बनवून झाला फरार

लग्नापूर्वी पतीने एच आय व्ही असल्याचे लपवले, पत्नीला पॉझिटीव्ह बनवून झाला फरार 


धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेना आरोप केला आहे की पतीने लग्नापूर्वी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लपवले होते. त्यामुळे लग्नानंतर ती देखील एचआयव्ही पॉझिटिव्ह आली. सतत आजारी पडत असल्यामुळे सासरच्या मंडळींनी महिलेला माहेरी सोडले, याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मेरठच्या पल्लवपुरम पोलीस स्टेशन भागातील हे प्रकरण आहे. पती फरार असल्याची चर्चा आहे.

पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत काय म्हटलं?

२०२१ मध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलीशी लग्न केले होते. मुलीच्या लग्नासाठी मी १५ लाख रुपये खर्च केले. मात्र सासरचे लोक हुंड्यावर खूश नव्हते. ते सतत हुंड्याची मागणी करत होते. मुलगी हा सर्व त्रास सहन करत होती.  तसेच आरोपी व्यक्ती लग्नाआधीच एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. पण लग्नावेळी त्याने हा आजार लपवून ठेवला होता. लग्नानंतर मुलगी देखील पॉझिटिव्ह आली. 

त्यामुळे तिला मारहाण करुन तिच्या माहेरी सोडले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यावर अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार केले तेव्हा रक्त तपासणीत ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.  सासरच्या लोकांनी मुलीला कालबाह्य झालेली औषधे दिली होती. हॉस्पीटलमध्ये असताना मुलीला नवरा एकदाही भेटायला आला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर तो हॉस्पीटलमध्ये आला होता. 


याप्रकरणी पोलीस अधीक्षक पीयूष सिंह म्हणाले, गेल्या आठवड्यात पल्लवपुरम पोलिस ठाण्यात पती-पत्नीमधील वादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक आरोप आहेत, त्यापैकी एक म्हणजे तिचा पती आधीच एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. लग्नाआधी त्याने हे लपवून ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून योग्य कारवाई केली जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.