Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष कारावास, दंड

मतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष कारावास, दंड


सांगली:  मतीमंद मुलीच्या मानसिक असाहयतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास १० वषेर् सश्रम कारावासाची तसेच पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर तदथर् जिल्हा व सत्र न्या. श्रीमती. एम. एम. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातफेर् अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकणीर् यांनी काम पाहिले.  

प्रशांत रामचंद्र रेंदाळकर (वय ३२, रा. वरचे गल्ली, तासगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीची एक नातेवाईक चोरून दारू विकते. प्रशांत तेथे दारू पिण्यासाठी येत होता. एकदा पीडित मुलगी नातेवाईक महिलेसोबत शेळ्या घेऊन ओढ्याकाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या महिलेने तिला शेळ्या घेऊन नारळाच्या बागेजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी प्रशांत याने तिला गाठून तुला नवीन कपडे घेऊन देतो, तुझ्याशी लग्न करतो असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईक महिलेने याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात फियार्द दिली. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 

या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यावेळी सरकार पक्षातफेर् ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे तपासल्यानंतर न्या. पाटील यांनी प्रशांत याला शिक्षा सुनावली. या खटल्यात तासगावचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, सहायक निरीक्षक पंकज पवार, सुनीता आवळे, रुक्मिणी जुगदर यांनी मदत केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.