Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिराळ्यातील वनरक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा

शिराळ्यातील वनरक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा


शिराळा : येथील श्रीराम कॉलनीमध्ये चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय ३४ ,सध्या रा. श्रीराम कॉलनी, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नी प्रणाली प्रमोद कोळी हिच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे मनास वाईट वाटून घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृत प्रमोदच्या आईने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

मोदचा विवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता.

अधिक माहिती अशी, प्रमोद कोळी हे चांदोली झोळंबी या ठिकाणी दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. ते शिराळ्यातील श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून पत्नीसोबत राहत होते. सोमवारी, दि. १४ ऑगस्टच्या रात्री आठनंतर प्रमोद बेडरूममध्ये काम करत बसले होते. पत्नी प्रणाली बाजूच्या खोलीत झोपली. मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता प्रणाली प्रमोद यांना उठवण्यास गेली. बेडरूमला आतून कडी होती. बराच वेळ आवाज देऊन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रणालीने घरमालक घोडके यांना माहिती दिली. प्रमोदने बेडरूममधील खोलीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले होते.

याबाबत मृत प्रमोदच्या आई जयश्री पांडुरंग कोळी यांनी फिर्याद दिली दिली. यामध्ये संशयित प्रणालीचे लग्नाअगोदर कोणत्या तरी मुलाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तिने प्रेमसंबंध सुरू ठेवले होते. ती मोबाईलवरून सारखी बोलत असे. या कारणामुळे प्रमोद व प्रणाली यांच्यात भांडण होत होते. या कारणावरून प्रमोद हा मानसिक तणावात राहत होता. दि. १४ ऑगस्ट रोजी याच कारणावरून प्रमोदबरोबर प्रणालीने भांडण काढून मानसिक त्रास दिल्यामुळेच व आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील हे तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.