काय आहे मुद्रा लोन; जाणून घ्या कसा करावा अर्ज...
मुद्रा योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज सहज करू शकता. तुम्ही व्यापारी आहात आणि तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे का? तुम्ही व्यावसायिक आहात आणि स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहात? भांडवलाअभावी तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नसाल तर आजच मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करून हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.
एक लोकप्रिय योजना :
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारची लहान व्यावसायिकांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणारी एक लोकप्रिय योजना आहे. त्याला मुद्रा लोन असंही म्हणतात. 2019-2020 या आर्थिक वर्षात 6 कोटी 22 लाखांहून अधिक व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुद्रा योजनेत महिलांना प्राधान्य दिलं जातं. या योजनेअंतर्गत, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि मायक्रो फायनान्स संस्थांना (MFIs) 25 bps कमी व्याजदराने कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुद्रा योजनेअंतर्गत 3 श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते:
शिशु : ₹५०,००० पर्यंत
किशोर : ₹50,000 ते ₹5 लाख
तरुण : ₹5 लाख ते ₹10 लाख
व्यवसायांसाठी श्रेणी अंतर्गत कर्ज : व्यवसायाचा विस्तार
करण्यासाठी तरुण वर्गात साधारणपणे कर्ज दिलं जातं. त्याचवेळी कमी भांडवलानं सुरू होणाऱ्या व्यवसायांसाठी शिशु श्रेणी अंतर्गत कर्ज दिलं जाते. मुद्रा कर्जावरील व्याज दर आणि अटी प्रत्येक बँकेत बदलू शकतात. SBIचा व्याजदर किमान 9.75 टक्के आहे. तर पीएनबीचा दर 9.60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्ज तीन ते पाच वर्षांत ईएमआय स्वरूपात बँकांना परत करावं लागेल. व्याज दर किंवा ईएमआय कालावधी व्यवसायाच्या मागील क्रेडिट आणि उलाढालीनुसार ठरवला जातो.
मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा : कर्जासाठी अर्ज सरकारी, खासगी, परदेशी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या जवळच्या शाखेत तसंच NBFC किंवा MFIs मध्ये केले जाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. ज्या बँकेत तुमचं आधीच खातं आहे, त्याच बँकेत तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा. तुम्ही मुद्रा लोन वेबसाइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकता.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
वेगवेगळ्या बँकांना अधिकारी तुमच्याकडून या कागदपत्रांची मागणी करू शकतात. ओळखीचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स सारखी कागदपत्रे) राहण्याचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, उत्पन्नाचा पुरावा (आयटीआर, विक्रीकर रिटर्न सारखी बँक पासबुक सारखी कागदपत्रे) इतर गरजेची केवायसी कागदपत्रे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)