आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासनाकडून तयारी पूर्ण
सांगली: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज या सर्व तयारीचा आढावा आयुक्त सुनील पवार यांनी घेत उत्सव काळात कोणत्याही कमतरता भासू देऊ नका अशा सूचना प्रशासनाला केल्या.
महापालिकेत आयोजित बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओहोळ, उपायुक्त राहुल रोकडे , उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी , स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते यावेळी मागील उत्सवाच्या आराखड्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवमध्ये कशा पद्धतीचे नियोजन करायचं याबाबतचा आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला असून यामध्ये श्री गणेशाच्या आगमना पासून ते अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकांपर्यंत सर्व तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.
यामध्ये उत्सवापूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्ते खड्डे मुक्त करणे, उत्सव काळात स्वच्छता ग्रहांची स्वच्छता ठेवणे, कृत्रिम कुंडाची संख्या वाढवणे तसेच निर्माल्य कलश उभा करून त्यामध्ये निर्माल्य संकलन करणे तसेच तिन्ही शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या आवाराची स्वच्छता तसेच सार्वजनिक रस्त्यावरील स्वच्छता याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)