🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

100 विद्यार्थिनींना विषबाधा

100 विद्यार्थिनींना विषबाधा

गडचिरोली जिह्यातील धानोरा येथे शासकीय आश्रम शाळेतील 100 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थिनींना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा मुख्यालयात हलवले आहे.


बुधवारी दुपारी आलू, गोबी, वरण भात याचे भोजन दिले होते. जेवल्यानंतर विद्यार्थिनींना थोडय़ाच वेळात पोटात दुखायला लागले तसेच चक्कर येणे सुरू झाले. विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.