महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही; पकडतात 50 लाख आणि दाखवतात 50 हजार, शिवसेना आमदाराचा आरोप
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यावेळी आमदार गायकवाड यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय. दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस खात्यातील
भ्रष्टाचारावर भाष्य केलंय. सरकारने एक कोणता कायदा केला की, पोलिसांचा एक
हप्ता वाढत असतो,असेही ते म्हणालेत.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी पोलीस खात्यात भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप केलाय. जर सरकारने कायदा केला तर पोलिसांचा एका हप्ता वाढतो. जर गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो. दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो. पण जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, असं गायकवाड म्हणालेत. दरम्यान संजय गायकवाड यांच्या मुलाला निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यावरून बोलताना आमदार गायकवाड म्हणाले, मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाचा पहाडाला पार करावं लागेल. त्यावरून त्यांनी पोलिसांवर तोफ डागली आणि पोलीस अकार्यक्षम असल्याची टीका केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.