रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात; लोणावळ्यात दुचाकीची धडक
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाला आहे. लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये एका दुचाकीने रावसाहेब दानवे यांच्या कारला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये मोटरसायकलचे मोठे नुकसान झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वाराने दानवेंशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर स्थानिक रिक्षाचालकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. अपघातात दानवे यांना कोणतीही दुखापात झाली नसून त्यांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान, या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प असल्याचं दिसून आले. स्थानिक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत मात्र ते स्वतःच्या दुकानापुरते ठेवले आहेत. तर पोलीस यंत्रणेने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचं निर्दशनास आले.
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचाही झाला होता अपघात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली होती. एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.