Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापूर :- डॉ. शिरीष वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

सोलापूर :- डॉ. शिरीष वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरची आत्महत्या
 

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एका तरुण डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आदित्य नमबियार असे मृत शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.

आदित्यने गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. आदित्य नमबियार डॉ. वीएम गवर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. 2019 च्या बॅचचा तो विद्यार्थी होता. आदित्य सध्या भाड्याच्या घरात राहत होता. तिथेच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.  प्राथिमक माहितीनुसार आदित्याने आत्महत्ता केली असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुगाणालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.