Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"गांजा भारतात अवैध पण, अमेरिकेत कॅन्सर रुग्णांना.", डॉ. नेनेंचा खुलासा; म्हणाले.

"गांजा भारतात अवैध पण, अमेरिकेत कॅन्सर रुग्णांना.", डॉ. नेनेंचा खुलासा; म्हणाले.
 

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितप्रमाणे तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील सर्वत्र चर्चेत असतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे, यावर चाहत्यांना नवनवीन हेल्दी रेसिपीजचे व्हिडीओ, आरोग्य व बदलत्या जीवनशैलीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. माधुरी, तिची दोन्ही मुलं आणि सासू-सासरे सुद्धा डॉ. नेनेंच्या अनेक व्हिडीओमध्ये सहभागी होताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी, डॉ. नेनेंनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर YouTuber रणवीर अलाहाबादियाशी गप्पा मारल्या होत्या. यावेळी त्यांनी ड्रग्ज व त्यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली होती. भारतात गांजा अवैध आहे पण, अमेरिकेत याचा वापर औषध म्हणून देखील केला जातो असं नेने यांनी यावेळी सांगितलं होतं.

माधुरीच्या नवऱ्याने सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या अयाहुआस्का ( Ayahuasca ) या ड्रगबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, “भारतात गांजासारख्या गोष्टींबद्दल अत्यंत चुकीचा समज आहे. लोकांना त्याच्या वैद्यकीय वापराबद्दल अनेक गोष्ट माहिती नाहीयेत. कारण, काही तपस्वी वर्षानुवर्षे त्याचं सेवन करत आहेत. याबद्दल सविस्तर सांगायचं झालं, तर LSD हे मूळतः सैनिकांची युद्ध यंत्र बनवण्यासाठी तयार केलं गेलं होतं. पण, आता आम्हाला असं आढळून येत आहे की, हे नैराश्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तसेच याचे इतरही फायदे असू शकतात. पण, लोक स्वत:च्या मजेसाठी याचं सेवन करतात हे चुकीचं आहे.”

नेने पुढे म्हणाले, “गांजा हे पूर्वी शेड्यूल १ चे ( कर्करोग पहिली स्टेज ) औषध होते. आम्ही अमेरिकेत आमच्या कर्करोगाच्या रुग्णांना हे औषध प्रिस्क्राइब करायचो. कारण, केमोथेरपीनंतर रुग्णांची भूक वाढवण्यास त्यामुळे खरोखरच मदत होते. त्यामुळे मळमळ कमी होते. क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम असलेल्या तसेच इतर काही रुग्णांनाही हे औषध दिलं जात होतं. आता अमेरिकेत हे औषध कायदेशीर करण्यात आलं आहे. पण, भारतात अवैध आहे. अर्थात मी याच्याशी सहमत आहे कारण, सामान्य लोकांच्या वापरावर निर्बंध हवेत. कारण, मला भीती आहे की, याचं अतिप्रमाणात सेवन करणारे लोक अडचणीत येऊ शकतात. 
 
कारण, काही सर्वेक्षणांनुसार, आता अमेरिकेतील लोक अल्कोहोलपेक्षा जास्त गांजा वापरत आहेत.” “मी किंवा रणवीर या अशा घातक पदार्थांच्या सेवनाचं अजिबातच समर्थन करत नाहीये. तुम्ही पंजाबमध्ये जा, रस्त्याच्या कडेला गांजा वाढतो… त्याचा औषधांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. पण, लोकांनी त्याचा गैरवापर केला आहे. कोणत्याही निर्बंधाशिवाय या गोष्टी उघडपणे वापरल्या जातात हे मात्र खरंच चुकीचं आहे.” त्यामुळे व्यसनाधीन होऊ नका, डॉक्टरांचं नेहमी ऐका असा सल्ला माधुरीच्या नवऱ्याने दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.