नागपूर :- पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून दोन मुलींची केली नग्नपूजा; भोंदूबाबाने दोन्ही मुलींवर केला बलात्कार
नागपूर : मध्यरात्री नग्नपूजा केल्यानंतर नोटांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून एका मुलाच्या माध्यमातून दोन मुलींना पूजेसाठी तयार केले. मात्र, नग्नपूजा करताना दोन्ही मुलींवर भोंदूबाबाने बलात्कार केला. रात्रभर पूजा केल्यानंतरही पैशांचा पाऊस
न पडल्यामुळे भोंदूबाबाचे बिंग फुटले. हा धक्कादायक प्रकार कपिलनगर पोलीस
ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी दोन्ही मुलींनी मित्राच्या मदतीने
पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी भोंदूबाबासह चार
आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कपिलनगर पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, आरोपी आशिष व त्याची पत्नी हे दोघेही कपिलनगरात राहणाऱ्या
कदीलबाबा याचे भक्त आहेत. कदील बाबाने आशिषला नोटांचा पाऊस पाडण्याबाबत
विश्वास दर्शविला, त्यासाठी दोन अल्पवयीन मुलींची मध्यरात्री नग्नपूजा
करावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे आशिषने आपल्या एका मैत्रिणीच्या
माध्यमातून दोन मुलींशी संपर्क साधला. दोन्ही मुलींची घरची स्थिती हलाखीची
आहे. त्यामुळे पैशांच्या आमिषाने दोघीही नग्नपूजा करण्यासाठी तयार झाल्या.
रविवारी मध्यरात्री पूजा करण्याचे ठरले. दरम्यान, त्या दोघींचा मित्र आदू याला याबाबत माहिती मिळाली. त्याने दोन्ही मुलींना भोंदूबाबावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आणि निघून गेला. रविवारी भोंदूबाबा कदील याने आशिषच्या घरी दोन्ही मुलींना बोलावून घेतले, मध्यरात्री दोघींचीही नग्नपूजा केली. यादरम्यान, दोघींवरही बलात्कार केला. मात्र, रात्रभर पूजा केल्यानंतरही नोटांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मुलींना एक पैसाही न देता घराकडे परत पाठविले.पैसे न मिळाल्याने हिरमोड झालेल्या दोघीही दुसऱ्या दिवशी त्यांचा मित्र आदू याला भेटल्या. त्यांनी भोंदूबाबाने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या आदूने भोंदूबाबाला मारहाण केली. तसेच दोन्ही मुलींना मानकापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मुलींनी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार ठाणेदार काळसेकर यांना सांगितला. गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबासह चौघांना अटक केली. दोन्ही मुलींवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.