भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदूच; महावीर जयंतीला जैन मुनींचे विधान
 

जैन धर्माचे  २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर  यांची जयंती दि. १० एप्रिल २०२५ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात भगवान महावीरांचे भव्य चित्ररथ काढण्यात येत आहेत. यावेळी जैन मुनी भट्टारक प्रमेय सागर म्हणाले की, जैन धर्म  आणि सनातन हिंदू  धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते म्हणाले की, भारतात राहणारे सर्वच हिंदू  आहेत, मग तो कोणत्याही धर्माचे पालन करत असला तरी.

जैन मुनी पुढे म्हणाले की, भगवान महावीरांचा संदेश केवळ जैन धर्माच्या  लोकांसाठी नाही तर सर्व लोकांसाठी आहे. भारताच्या उदयापासून जैन धर्म  आणि सनातन धर्म  एकमेकांना पूरक आहेत. राम आणि भगवान महावीर  एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यांनी सांगितले की रामाच्या ‘रा’ मधील ऋषभदेव आणि ‘म’ मधील महावीर, दोन्ही नावे सारखीच आहेत. ते म्हणाले की, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो हिंदू असो, मुस्लिम  असो, शीख  असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो… सर्व हिंदूच  आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.