Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Kolhapur: पाहुणा बनून लग्नात आला, रूबाबात कोल्हापुरी फेटा बांधला अन् लग्नात 'असा' काही कांड केला की..

Kolhapur: पाहुणा बनून लग्नात आला, रूबाबात कोल्हापुरी फेटा बांधला अन् लग्नात 'असा' काही कांड केला की..



लग्न म्हटलं आनंद आणि पाहुण्यांची रेलचेल. पण कोल्हापुरातील एका लग्न सोहळ्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. आरोपी चक्क लग्नात पाहुणा बनून आला आणि सराईत चोरट्याने चक्क हात साफ केला. आरोपी कोल्हापूरी फेटा बांधून आला आणि त्याने संधी साधत दागिन्यावर डल्ला टाकला. भामट्याने एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला. 

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी कोल्हापुरातील आदमापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील आदमापूरमध्ये एक लग्न सोहळा पार पडत होता. या लग्न सोहळ्यात आरोपी देखील पोहोचला. आरोपीने पाहुणा म्हणून लग्नात हजेरी लावली. तसेच कोल्हापूरी फेटा देखील बांधला. त्यानंतर पाहुण्यांनी भरलेल्या लग्न सोहळ्यात चोरी करण्याची संधी शोधत होता.


जशी भामट्याला संधी सापडली त्याने लग्नातील दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकारानंतर लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ करून भामट्याला बेड्या ठोकल्या. आरोपीची चौकशी केली असता, त्याच्याकडून एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीची क्राईम हिस्ट्री

बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे येथे घरफोडी आणि जबरी चोरीचे तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. हा भामटा चोरी करून दागिने तसेच रोकड घराच्या मागील गोठ्यात किंवा जमिनीखाली पुरून ठेवत असल्याची माहित समोर आली आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.