ऑपरेशन सिंदूर फत्ते केलेल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम व अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्याप्रती सांगली काँग्रेसची सद्भावना...
सांगली दि. 18: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, 'ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला सलाम व अतिरेक्यांच्या हल्ल्यात बलिदान दिलेल्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी 21 मे रोजी सकाळी 8.30 वाजता सांगलीत मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारकापासून म. गांधी पुतळ्यापर्यंत 'तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय आज काँग्रेस भवनात माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमित सिंह या महिला अधिकाऱ्यांनी व सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सांगलीकर सैनिकांसोबत ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
तिरंगा रॅलीचा प्रारंभ मार्केट यार्ड समोरील हुतात्मा स्मारक सांगली येथून बुधवार दि. २१ मे २०२५ रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. ही तिरंगा यात्रा हुतात्मा स्मारकापासून सुरू होऊन पुष्पराज चौक मार्गे राम मंदिर ते काँग्रेस कमिटी समोरून आझाद चौक मार्गे राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत होणार आहे या ठिकाणी भारतीय सैनिकांना पाठिंबा दर्शवून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहलगाम येथे शहीद झालेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 21 मे हा दिवस माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृतिदिन असून हा दिवस याकरता निवडण्यात आलेला आहे. या रॅलीत भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम व अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने सांगलीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले आहे.यावेळी डॉ. जितेश कदम, संदीप जाधव, ॲड.आर आर पाटील, अशोकसिंग राजपूत, सदाशिव खाडे, सुरेश पाटील, दादासाहेब ढेरे, रवी पाटील, सुरेश मोहिते, बिपिन कदम, सनी धोतरे, अल्ताफ पेंढारी, अय्याजभाई नाईकवाडी, वसीम रोहिले, अण्णासाहेब कोरे, अनिल मोहिते, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, अरुण पळसुले, मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, तौफिक शिकलगार, राजेंद्र शिंदे, बाबासाहेब कोडग, राहुल गायकवाड, जयदीप भोसले, अजय पवार, महेश पाटील, चैतन्य पाटील, अँड.आसिफ जमादार, प्रशांत अहिवळे, महादेव पाटील, राहुल थोटे, आयुब निशाणदार, शिवाजी मोहिते, राजेंद्र कांबळे, आशिष चौधरी, सुरेश गायकवाड व सांगली जिल्ह्य़ातील सर्व तालुका अध्यक्ष, शहर जिल्हा पदाधिकारी व विविध आघाडी, सेलचे पदाधिकारी व सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक नंदकुमार शेळके यांनी केले व आभार सांगली शहर दक्षिण विभागाचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.