Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार :, नीलेश वाघमारेचे 2 रिसॉर्ट, बार आणि कोट्यावधिंची माया...

नीलेश वाघमारेचे गोव्यात दोन 'रिसॉर्ट', बार आणि कोट्यवधींची माया.
 

नागपूर: राज्यभर गाजत असलेला कोट्यवधींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अनेकांना अटक केली आहे. यातून पोलिसांच्या हातात रोज नवीन माहिती येत आहे. यामध्ये बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार आणि वेतन विभागाचा अधीक्षक नीलेश वाघमारे याचा अटक वॉरंट निघाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथक गोवा आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

तो गोव्याच्या 'रिसॉर्ट'मध्ये लपून असल्याची चर्चा आहे. वाघमारे संदर्भात एक नवीन माहिती हाती आली असून त्याचे गोवा येथे दोन रिसॉर्ट आणि नागपूरमध्ये बार आहे. त्यामुळे त्याने शालेय पोषण आहार आणि वेतन अधिक्षक पदावर असताना कोट्यवधींची माया जमवल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने 'शालार्थ आयडी' प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. या प्रकरणात नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या उपसंचालक उल्हास नरड यांची तक्रार आणि अहवालाच्या आधारावर वाघमारेचे निलंबन झाले होते. 

वाघमारे हा पूर्वी शालेय पोषण विभागामध्ये कार्यरत होता. यावेळी त्याने मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे. त्याच्यावर तेव्हाही कारवाई होणार होती. मात्र, राजकीय संबंधांमुळे तो वाचला. मात्र, त्यानंतर वेतन विभागात गेल्यावर त्याने पुन्हा भ्रष्टाचार सुरू केला. त्याच्या आशिर्वादानेच बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.