संभाजी भिडे यांनी सहा जूनला होणार शिवराजाभिषेक साजरा करू नका, असे आवाहन केले. सहा जूनचा राज्याभिषेक हद्दपार करण्यात यावा आणि केवळ तिधी प्रमाणे राज्याभिषेक साजरा केला जावा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी कुणी विरोध केला हे अख्खा महाराष्ट्र
जाणून आहे. आज त्याच मंडळी मधील एक मनोहर भिडे सारखी मंडळी राज्याभिषेक
पद्धत बंद करण्याची मागणी करतायत. सर्वसमावेशक धोरणांची अंमलबजावणी करणारे
छत्रपती शिवराय हे इथल्या तमाम रयतेचे, शेतकरी, शेतमजुरांचे राजे होते.
मनोहर भिडे सारख्यांचं हेच खरं दुखणं आहे.', असे यशोमती ठाकूर यांनी ट्विट
करत म्हटले आहे.
'भिडेने 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी जो
निधी राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून गोळा केला त्याचं काय केलं ? असा सवाल
देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तसेच आमच्या रयतेच्या राजाची बदनामी
करण्याचा घाट पुन्हा घालत असाल तर गाठ महाराष्ट्रातील शिवप्रेमी सोबत आहे,
हे भिडे यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा देखील त्यांनी दिला.
संभाजी भिडेंचा निषेध
सहा जूनचा राज्याभिषेक दिन साजरा करू नका या भिडेंच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी निषेध केला आहे. तसेच भ्रम निर्माण करून बहुजन महापुरुषांची बदनामी करायची, त्यांचं महत्त्व कमी करायचं हा ह्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यातूनच अशाप्रकारची विधानं ही मंडळी करत असतात, असा टोला देखील लगावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.