Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी २३ लाख घेतले, पुन्हा १८ लाख मागितले; ५ लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक

आधी २३ लाख घेतले, पुन्हा १८ लाख मागितले; ५ लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक
 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी  विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना ACB ने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडेच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक झाली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची मागणी केली होती. यापूर्वी २३ लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांनी १८ लाखांची अतिरिक्त मागणी केली. यातील ५ लाख रुपये घेताना ACB ने सापळा रचून त्यांना आणि अव्वल कारकून त्रिभुवन यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.