Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! बॉम्बस्फोटांनी पाकिस्तानातील लाहोर हादरलं, जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ

Big Breaking! बॉम्बस्फोटांनी पाकिस्तानातील लाहोर हादरलं, जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ
 

पाकिस्तानातील लाहोर शहरात आज सकाळी तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमुळे लाहोरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून विमानतळ बंद करण्यात आले आहे.स्फोट होताच नागरिकांची पळापळ सुरु झाली.

लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाला असून लोक घाबरून रस्त्यावर उतरले. सकाळी हे बॉम्बस्फोट झाल्याने नागरिकांमध्ये एकच भीती पसरली. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. हे स्फोट ड्रोन द्वारे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, पण हे हल्ले कोणी केले आहेत याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरील वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले आणि त्यांनी सांगितले की त्यांना धुराचे लोट त्यांच्या दिशेने येताना दिसले. यानंतर, माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके वॉल्टन रोडवर पोहोचली. लाहोरमधील स्फोटाबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलेकी विमानतळावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. स्फोटानंतर लाहोर विमानतळावर सायरनचा आवाज ऐकू आला आणि ते बंद करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.