युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासनास भाजपतर्फे सर्व सहकार्य
आमदार सुधीरदादा गाडगीळ ; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याबरोबर चर्चा
सांगली, दि.७: देशाच्या सीमेवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. साहजिकच सर्वत्र तणावाची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनावरही नागरिकांच्या सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची अधिक जबाबदारी आहे. अशावेळी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सांगली शहर जिल्हा विभागातील भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हा प्रशासनासोबत राहतील. प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य देतील,अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची आज भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते आवश्यक ती सर्व मदत करतील. प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील,अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी दिली.
यावेळी पक्षाचे माजी आमदार दिनकरतात्या पाटील,भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. नीता केळकर, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. स्वाती शिंदे, सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष सरगर, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, जिल्हा सरचिटणीस राजेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार आदी उपस्थित होते.
सांगली: सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे सांगली शहर जिल्हा विभागातील सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते जिल्हा प्रशासनात सोबत राहतील आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सर्व मदत करतील, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.