पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार विभागाने या नोकरभरतीस परवानगी दिली आहे. त्यानुसार शासकीय पॅनेलवर संस्थेच्या मार्फतच नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
येत्या 20 ते 25 दिवसांत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, त्या वेळी आगामी बॅंकेच्या निवडणुका, तसेच लांबणीवर पडलेल्या निवडणुका यांमुळे निवडणुका प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकरभरती करायची असेल, तर त्यासाठी पॅनेल निश्चित केले.
याच पॅनेलवरील संस्थांकडून नोकरभरती करण्याचे बंधन शासनाने घातले. यासंदर्भात बॅंकेने सहकार विभागाने यासंदर्भातील अभिप्राय मागविला असता, सहकार विभागानेसुद्धा पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी, असे नमूद केले. आता बँकेच्या संचालक मंडळाने नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले.जिल्हा बॅंकेत लिपिक व अन्य अशा सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया 20 ते 25 दिवसांत सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.– डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.