सांगली : हिराबाग वॉटर वर्क्समधून जलभवन, विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरूस्त झाल्याने सांगलीतील निम्म्या शहराला सोमवारपासून तीन दिवस अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
शहरातील हिराबाग वॉटर वर्क्समधून जलभवन व विश्रामबाग टाकीला जाणारा 75 एचपी मोटर पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे त्याऐवजी 70 एचपीचा पर्यायी जुना पंप चालू करणात येणार आहे. या पंपाचा पाणी पुरवठा थोडा कमी आहे. त्यामुळे या जलभवन टाकीवर अवलंबून असणार्या अनेक भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. याची नोंद नागरिकांंनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील चांदणी चौक, जलभवन परिसर, धामणी रोड, दत्तनगर, गणपती मंदिर परिसर, वालचंद कॉलेज आदी भागात सोमवारपासून अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. हा अपुरा पाणी पुरवठा तीन दिवस म्हणजे बुधवारपर्यंत असणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे यांनी केले आहे. पंप दुरुतीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. सध्या कमी पाणी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.