Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'गोविंदा आयुष्य बर्बाद करतोय,' पत्नी सुनिताने व्यक्त केली खंत; म्हणाली 'अनिल कपूर, सुनील शेट्टी....'

'गोविंदा आयुष्य बर्बाद करतोय,' पत्नी सुनिताने व्यक्त केली खंत; म्हणाली 'अनिल कपूर, सुनील शेट्टी....'
 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा चित्रपटांमध्ये काम न करता फक्त घरी बसून राहत असल्याने पत्नी सुनिता अहुजाने नाराजी जाहीर करत टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने गोविंदाच्या वयाच्या अभिनेत्यांचं उदाहरण देत तो आपलं आयुष्या बर्बाद करत असल्याचं म्हटलं आहे. बाहेर कुठेही न जात आणि अभिनय न करत तो आपलं आयुष्य वाया घालवत आहे असं सुनिता म्हणाली आहे. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सुनिताने मागील 6 वर्षांपासून गोविंदा मोठ्या स्क्रीनवर झळकला नसल्यावर भाष्य केलं. तिने यावेळी सांगितलं की, "मी त्याला नेहमी विचारते की तुझ्यासारखा महान अभिनेता घरात का बसला आहे? तुझ्या वयाचे अभिनेते अनिक कपूर, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ किती काम करत आहेत. मग तू का काम करत नाहीस?".

90 आणि 2000 च्या दशकात गोविंदा सुपरस्टार होता. गोविंदाचा चित्रपट म्हणजे यशाची हमी असं समीकरणच होतं. गोविंदाला चित्रपटात साईन करण्यासाठी निर्माते त्याच्या घराबाहेर रांग लावत असत. पण 2008 नंतर त्याचं स्टारडम संपुष्टात आलं. त्याने रावण, किल दिल चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळू शकलं नाही.

आपल्या मित्रांमुळेच गोविंदा मोठ्या पडद्यावर झळकत नसल्याचा आरोप सुनिताने केला आहे. आता प्रेक्षक 90 च्या दशकातील चित्रपटांसारखे चित्रपट पाहत नाही हे त्याचे मित्र त्याला सांगत नाहीत असाही आरोप तिने केला आहे. गोविंदाच्या मित्रांचा संदर्भ देत ती म्हणाली की, "पैशांसाठी त्याच्या आयुष्याची वाट का लावत आहात? त्याला वजन कमी करायला किंवा हँडसम दिसण्यासाठी प्रोत्साहन द्या".

सुनिता अहुजा आणि गोविंदाचं नातं

गोविंदा बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षात आणि सुनीता नववीत असताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. सुनिता तिच्या बहिणीच्या घरी राहत असे, जिचं लग्न गोविंदाच्या मामाशी झालं होते. सुरुवातीला त्यांचा प्रवास कठीण होता, मात्र नंतर ते प्रेमात रुपांतरित झालं. गोविंदा यशस्वी अभिनेता होण्याआधीच सुनीताशी त्याचं लग्न झालं. 1986 मध्ये लग्न केल्यानंतर,त्यांनी चार वर्षे नातं गुप्त ठेवलं. आता ते यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा या दोन मुलांचे पालक आहेत. त्यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.