हरिपूर : शहरातील पाटणे प्लॉट परिसरात साहिल सिकंदर फतेपूर (वय 5) या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये साहिल हा जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. साहिल फतेपूर हा शुक्रवारी रात्री
घरासमोर खेळत होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला.
कुत्र्याचा हल्ला होताच साहिल याने आरडाओरडा सुरू केला. यानंतर भटक्या
कुत्र्याने घटनास्थळावरून पळ काढला.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. परंतु भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला अपयश आल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध व्यक्तीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यानंतर महापालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली होती, तसेच पोलिस अधीक्षक, महापालिका उपायुक्तांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली होती. आता बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला झाल्यानंतर हे अधिकारी या बालकाची चौकशी करणार का, असा देखील सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.