Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये.
 

जत : जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उत्साहाने आणि ताकदीने भाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष स्थानिक पातळीवरील शासन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी, आणि लोकाभिमुख कारभार सुनिश्चित करण्यासाठी जनतेसमोर पर्याय म्हणून उभा राहत आहे, असे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी म्हटले आहे.

बसवराज पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, ‘आपण गावागावात कार्यकर्ते वाढवून समाजाच्या मूळ प्रश्नांवर काम करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खऱ्या अर्थाने लोकशाही रुजते. ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर परिवर्तन घडवण्यासाठी आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे आणि युवकचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत पक्षाची ‘संस्कार ! संकल्प !! सिध्दी !!’ ही घोषणा मार्गदर्शक ठरणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारित सकारात्मक प्रचार करून मतदारांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे.

चार महिन्यांत निवडणुका घ्या

महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता चार महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात, असा आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. या आदेशामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपसह सत्ताधारी महायुतीसाठी या निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

महानगरपालिकांतील भाजपची आघाडी
राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये एकूण 2736 जागा असून, यामध्ये मागासवर्गीयांसाठी 740, अनुसूचित जातींसाठी 327, अनुसूचित जमातींसाठी 76 आणि उर्वरित 1,593 जागा सामान्य वर्गासाठी राखीव आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे 1374 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.