डाळिंबात फायबर असते. डाळिंबाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुमची पचनसंस्था निरोगी राहते. डाळिंबामुळे अन्न लवकर पचते. तसेच पोटात मल सडत नाही. त्यामुळे आतडे स्वच्छ राहतात.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर असतात. जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. तुमच्या आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी तुम्ही जवसाच्या बियांचे सेवन करू शकता. पपईमध्ये पपेन एंझाइम असतो. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. पपई खाल्ल्याने आतड्यांमधील घाण निघून जाऊ शकते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हळदमध्ये असलेल्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये पुरातन काळापासून स्वयंपाकात त्याचा वापर होतो. आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी हळद खूप प्रभावी ठरू शकते. हळदीमध्ये कर्क्यूमिन आढळते जे जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. सफरचंदात फायबर असते. सफरचंद खाल्ल्याने पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे आतडे मजबूत होतात. सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात सफरचंदचे सेवन करा. नाश्त्यात सफरचंद खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.