Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?
 

आज जगभरातील भारतीय आनंद साजरा करत आहेत. पहलगाम हल्लाला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त केले. सध्या भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचं? याविषयी नागरीकांना जागरुकता देण्यासाठी मॉक ड्रील राबवलं जात आहे. आज मुंबईत, पुण्यात हे मॉक ड्रील राबवलं जात आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे  यांनी मॉक ड्रील संदर्भात त्यांचं स्पष्ट मत दिलं आहे.

मॉक ड्रीलविषयी सयाजी शिंदे काय म्हणाले?

सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आग लागली की विहीर खोदायला घ्यायची आणि पाणी पाहिजे असं म्हणायचं, हे कितपत सत्य होईल मला माहिती नाही. एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तरी माणसं खाली यायला नाही म्हणतात. नैराश्य किंवा कंटाळा हा आपला स्वभाव आहे, त्यामुळे मॉक ड्रील करून आपण जागरुक झालं पाहिजे.

"आपण मतदान नीट कुठे करतो? मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं ना! आपल्याकडे मतदानाची प्रकिया तरी कुठे नीट होते? यातच आपलं मूळ आहे आणि एकदा निवडून दिलं तर आपल्या हातात काय राहतं? मतदान केलं आता काय होतं ते बघत बसा एवढंच आपल्या हातात आहे. आपण काही म्हटल्याने फरक पडणार आहे का? युद्ध कधीच नाही व्हायला पाहिजे. देशात नाही किंवा राज्यातही नाही. माणूस म्हणून माणसाने माणसाकडे बघितलं पाहिजे. अशी घटना परत घडू नये म्हणून जे हवं ते करायला हवं."
 
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. सयाजी शिंदेंना आपण विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. सयाजी शिंदेंनी मराठीसह हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतही सक्रीय आहेत. सयाजी शिंदे पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करायचं काम करत असून ते ग्रामीण भागात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतात. सयाजी शिंदे यांचा आगामी सिनेमा '२६ नोव्हेंबर'ची सर्वांना उत्सुकता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.