Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुभाष टेकडी, उल्हासनगर येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला संपन्न

सुभाष टेकडी, उल्हासनगर येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला संपन्न
 

उल्हासनगर:  आज सुभाष टेकडी येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विचारमंथनाची पर्वणी घडली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीची सखोल आणि वैचारिक मांडणी करत अनेक नव्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. अभ्यासक किरण सोनवणे यांनी "दहशतवादावर एकमेव उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर प्रभावी भाषण करून आंबेडकरांचा या विषयावरील दृष्टिकोन उलगडून सांगितला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. गोपाल भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ धम्म अभ्यासक शिलाताई जाधव, लताताई पडघाण, आणि शुभांगीताई चव्हाण उपस्थित होत्या.




कार्यक्रमात खालील मान्यवरांना भीमरत्न व भीमयोद्धा पुरस्कार २०२५ ने गौरवण्यात आले:

1. कु. स्मित रवि नागदिवे – IIT मध्ये शिक्षण घेऊन वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरल्याबद्दल भीमरत्न पुरस्कार २०२५.

2. नानासाहेब बागुल, अरुण काकळीस, महेंद्र उबाळे, शशी सावंत – डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा सुभाष टेकडी येथे उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५.

3. जयराम बागुल आणि  काळकथीत आनंदा निकम – १९८९ मध्ये सुभाष टेकडीवरील पहिल्या पुतळ्याच्या स्थापनेतील मोलाचे नेतृत्व केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५.

4. ॲड. गोपाल भगत, ॲड. अमित कटारनवरे, महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित – अनुसूचित जाती-जमातीच्या पिढ्यान्‌पिढ्या वंचित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५.

5. उत्तम कांबळे व किरण सोनवणे – व्याख्यानांद्वारे महाराष्ट्रात संविधानवादी आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. सचिन खंडागळे यांनी केले. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी या प्रसंगी सांगितले की, "समाजाला बौद्धिक खाद्य देण्याचे आणि विचारांची मशागत करण्याचे कार्य संघटना सातत्याने करत राहील." कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल आढाव, ॲड. राहुल बनकर, ॲड. रुपेश उबाळे, ॲड. सुधीर पंडित, ॲड. निलेश धिवरे, मयूर पगारे, छगन पवार, अविनाश उबाळे, सुशील सोनवणे, सुमेध तांबे, वाल्मीक सोनवणे, अक्षय कांबळे, ॲड. नागसेन ब्रह्मराक्षस, सिद्धार्थ मोरे, तुषार मिरपगार, राहुल गच्छे आणि अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.