इंडियन ऑईलनं एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट केले आहेत. दरम्यान, आज १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झालेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १७ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आज १ मे रोजी कोलकात्यात हाच व्यावसायिक
सिलिंडर १८६८.५० रुपयांऐवजी १८५१.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत या
सिलिंडरची किंमत १७१३.५० रुपयांवरून १६९९ रुपये आणि चेन्नईत १९२१.५०
रुपयांऐवजी १९०६.५० रुपये करण्यात आली आहे. दिल्लीत आता १९ किलोचा
व्यवसायिक सिलिंडर १७४७.५० रुपयांना मिळणार आहे. आज, १ मे २०२५ रोजी घरगुती
एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५०
रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना उपलब्ध होतील.
घरगुती एलपीजी गॅसचे दर ८ एप्रिल रोजी
अपडेट करण्यात आले होते. तेव्हा सरकारनं १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या
दरात ५० रुपयांची वाढ केली. ही वाढ जवळपास वर्षभरानंतर झाली. १ एप्रिल रोजी
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. दिल्लीत १९
किलोचा एलपीजी सिलिंडर ४१ रुपयांनी स्वस्त होऊन १७६२ रुपये झाला असून आज १
मे रोजी दरात कपात करण्यात आली आहे.
३०० रुपये स्वस्त मिळतोय सिलिंडर
देशात एकूण ३२.९ कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी १०.३३ कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत, जिथे गरिबांना ३०० रुपये कमी किंमतीत सिलिंडर मिळतात. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सरकारनं एलपीजी सबसिडीसाठी ११,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी (२०२२-२३) इंधन कंपन्या तोट्यात सिलिंडर विकत असल्याने त्यांना २२ हजार कोटी रुपये देण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.