Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी बडा मासा गळाला; माजी उपसभापती जमदाडेला बेड्या

मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी बडा मासा गळाला; माजी उपसभापती जमदाडेला बेड्या


राज्यात गाजत असलेल्या तुळजापूरड्रग्ज रॅकेट प्रकरणात ताजी माहिती हाती आली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. जमदाडेला तुळजापुरातील कामठा येथून अटक करण्यात आली. यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. जमदाडेच्या अटकेनंतर या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या 16 झाली आहे. परंतु यातील काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

 
याबाबत आधिक माहिती अशी, फेब्रुवारी महिन्यात तामलवाडी पोलिसांनी तुळजापूर शहरात येणाऱ्या एमडी ड्रग्जवर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत सुरुवातीला तीन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. नंतर यात आणखी 33 जणांचा सहभाग आढळून आला. पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली. तर आणखी काही आरोपी अजूनही फरार आहेत.


या प्रकरणात पोलिसांनी दहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. शरद जमदाडेच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी महत्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचा माजी उपसभापतीच या रॅकेटमध्ये सहभागी होता. ही गोष्ट धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी बड्या माशांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आणखी काही आरोपी अजूनही मोकाटच आहेत.

या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोकूळ ठाकूर यांचे पथक आरोपींच्या मागावर आहे. या आरोपींना लवकरात लवकर अटक करुन जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.