Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुगल वापरकर्त्यांसाठी सरकारचा अलर्ट! पटकन बदला 'ही' सेटिंग, नाहीतर हॅक होऊ शकतो मोबाईल अन् लॅपटॉप

गुगल वापरकर्त्यांसाठी सरकारचा अलर्ट! पटकन बदला 'ही' सेटिंग, नाहीतर हॅक होऊ शकतो मोबाईल अन् लॅपटॉप
 

जर तुम्ही Google Chrome ब्राउझरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे. भारत सरकारच्या Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने Chrome च्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी हाय रिस्क सायबर सुरक्षा इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, Chrome च्या जुन्या व्हर्जनमध्ये एक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळली आहे. ज्यामुळे सायबर हॅकर्सना तुमच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश मिळू शकतो आणि हॅकिंग होऊ शकते

कोणत्या वापरकर्त्यांसाठी धोका आहे?

CERT-In च्या सल्ल्यानुसार, Google Chrome च्या जुन्या डेस्कटॉप व्हर्जन्समध्ये हा त्रुटीचा धोका आहे. जर तुमचा Chrome व्हर्जन 136.0.7103.113 किंवा यापेक्षा जुना असेल, तर तुम्ही सायबर हल्ल्याच्या जोखमीच्या क्षेत्रात आहात.

Google ने ही त्रुटी नवीन व्हर्जनमध्ये सुधारली असून Chrome 136.0.7103.113 आणि त्याहून नवीन व्हर्जन वापरणाऱ्यांना कोणताही धोका नाही.

Chrome अपडेट कसे करावे?

तुमच्या Chrome ब्राउझरला सुरक्षित ठेवण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा

Chrome उघडा.

वर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स .

Settings निवडा.

खाली स्क्रोल करून "About Chrome" वर .

येथे Chrome आपोआप अपडेट होईल आणि नवीन व्हर्जन डाऊनलोड होईल.

अपडेटनंतर ब्राउझर रिलॉन्च (पुन्हा सुरू) करा.

यानंतर तुम्ही व्हर्जन तपासू शकता. ते 136.0.7103.114 असल्याची खात्री करा.

दरम्यान, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एयरटेलने 38 कोटी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी Fraud Detection Solution सुरू केले आहे. या प्रणालीमुळे फसवणूक कॉल्स, फिशिंग लिंक्स आणि इतर ऑनलाइन स्कॅम्स ओळखले जातील आणि ग्राहक सुरक्षित राहतील.

Google Chrome वापरकर्त्यांसाठी हा एक गंभीर सुरक्षा इशारा आहे. तुमचे ब्राउझर जर जुन्या व्हर्जनचे असेल, तर लगेच अपडेट करा. नाहीतर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. इंटरनेट सुरक्षिततेसाठी सावध राहा आणि वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करत राहा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.