Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

..म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार ? सरकारचा प्लॅन नेमका काय?

...म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार ? सरकारचा प्लॅन नेमका काय?
 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत. खरे तर सध्या आपल्या महाराष्ट्रात अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे इतके आहे. मात्र राज्यातील ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे आहे. याशिवाय देशातील जवळपास 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे 60 वर्ष तसेच काही राज्यांमध्ये हे वय 62 वर्ष इतके आहे.

यामुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेले पाहिजे अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून उपस्थित केले जात असून याबाबत सरकार सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत आमचे सरकार सकारात्मक आहे असे वारंवार सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा निर्णय काय होऊ शकला नाही. दुसरीकडे आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते असा दावा केला जात आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार
भारतात प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचारी 58 ते 60 व्या वर्षी रिटायर्ड होतात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके आहे.  मात्र फ्रान्समध्ये तेथील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांवरून 64 वर्ष इतके करण्यात आले आहे. म्हणजेच फ्रान्समधील कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज दोन वर्षांनी वाढले आहे. यामुळे भारतात देखील असाच काहीसा निर्णय होऊ शकतो असा दावा सध्या मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार जगभरातील अनेक देशांनी तेथील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले आहे. फ्रान्सने सुद्धा अलीकडेच रिटायरमेंटचे वय 64 वर्ष एवढे केले आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास वारंवार भरती टाळता येते, यामुळे पेन्शन वरील बोजा कमी होतो, अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला फायदा होतो आणि हेच कारण आहे की भारतात सुद्धा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकारकडून निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे या संदर्भात खरंच सरकारकडून काही सकारात्मक निर्णय होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

 
सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढणार का?

देशातील काही राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांपर्यंत केले आहे. काही वैज्ञानिक संस्थांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 62 ते 65 दरम्यान आहे. उच्च न्यायालयात सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष येथे आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे एवढे आहे. दरम्यान मध्यंतरी सरकारला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबत किंवा कमी करण्याच्या बाबत सरकारकडून काही विचार सुरू आहे का असा सवाल विचारण्यात आला होता. संसदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र यावर उत्तर देताना सरकारने यासंदर्भात कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे म्हटले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.