Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! अजित पवार गटातील आमदाराचा भीषण अपघात; ट्रक आणि कारची धडक

Breaking News ! अजित पवार गटातील आमदाराचा भीषण अपघात; ट्रक आणि कारची धडक
 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे  यांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विठे घाटात हा अपघात झाला. अकोले येथून राजूरकडे प्रवास करत असताना त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या एका ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामुळे आमदार लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे, परंतु सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर आमदार लहामटे हे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी परतले आहेत. ट्रक आणि कारची धडक इतकी जोरदार होती की, आमदार लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ते अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, सुरुवातीला आमदार लहामटे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविला होता. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात सामील झाले. सध्या ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.