Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैष्णवी हगवणे प्रकरणात दमानियांचा मोठा गौप्यस्फोट; IG जालिंदर सुपेकरांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे उडाली खळबळ!

वैष्णवी हगवणे प्रकरणात दमानियांचा मोठा गौप्यस्फोट; IG जालिंदर सुपेकरांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे उडाली खळबळ!
 

वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या जाण्याचं थोडंही सोयरसुतक नव्हतं... वैष्णवीच्या चितेचा विस्तव विझलाही नसेल तेवढ्यात हगवणे नराधम बाप-लेकानं मौज-मस्ती सुरू केली. मटणावर ताव काय मारला... महागड्या गाड्यांमधून काय फिरलेत. तसंच वेगवेगळ्या फार्म हाऊसवर लॅविश लाईफ देखील जगलेत. या सात दिवसात हगवणे बाप-लेकानं निर्लज्जपणाचा कळस गाठला होता. मात्र या हगवणे कुटुंबाच्या पाठिमागे सात दिवस कोण होतं? तसंच त्यांना दिलेल्या महागड्या गाड्या कोणी पुरवल्या? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतायत. या सर्व पार्श्वभूमीवर एका आयपीएस अधिकाऱ्याची कथित ऑडिया क्लिप व्हायरल होतेय. यात तो आपले नाव याप्रकरणातून काढून टाकण्यासाठी समोरच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकत असल्याचे ऐकून येतंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

 
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केलेत. ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा दमानियांनी केलाय. 'या प्रकरणातून माझं नाव काढाट, असं सुपेकर या ऑडिओ क्लिपमधून सांगत असल्याचाही दावा दमानियांनी केलाय. जालिंदर सुपेकर एका पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर संवाद साधताना एक कथित ऑडियो क्लिप व्हायरल होतेय. झी 24 तास या ऑडियो क्लिपला दुजोरा देत नाही.
काय झालाय संवाद?

कारण नसताना त्यात माझं नाव कशाला टाकता? असे सुपेकर पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहेत. मी साहेबांना बोलतो, तुम्हाला फोन जोडून देतो असे उत्तर पोलीस अधिकारी समोरुन सांगतो. यासाठी दुसरे निवदेन तयार करा आणि त्यातून माझे नाव काढा असे सुपेकर सांगतायत. त्यांनी काय निवेदन केले मला माहिती नाही पण त्यात तुमचे नाव आहे, असे सुपेकर सांगतायत. मला काय फायदा होईल, असे पोलीस अधिकारी विचारतो. यात शंभर टक्के फायदा होणार असे सुपेकर सांगताना या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकू येतंय.



कोण आहे जालिंदर सुपेकर?
IPS जालिंदर सुपेकर हा शशांक हगवणेचा म्हणजेच वैष्णवीच्या नवऱ्याचा सख्खा मामा असल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि तिचे सासरे राजेंद्र हगवणेला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अशी शंका रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केली होती. IPS जालिंदर सुपेकर यांच्या माध्यमातून त्यांना काही सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसावर कारवाई करण्यात येईल. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल, असंही ठोंबरेंनी म्हंटलंय.
दमानियांचाही आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानियांनीदेखील याप्रकरणात गंभीर आरोप केलेयत. वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे IG म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत, त्यांच्या मी माहिती घेतली असून या मांमांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. जालिंदर सुपेकर या शशांकच्या IG मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे. जळगाव मध्ये PSI सादरे जे होते त्यांना या IG नेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

काय म्हणाले सुपेकर?
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात आयपीएस सुपकेर यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी याप्रकरणावर आपली बाजू मांडलीय. हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असल्याचे त्यांनी म्हटलंय. असं असलं तरी हगवणे त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नसल्याचे सुपेकर यांनी म्हटलंय. मलाही दोन मुली असून अशा गंभीर अन निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हायलाच हवी, ही माझी स्पष्ट भूमिका असल्याचे सुपेकर यांनी म्हटले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.