Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत धक्कादायक घटना; बुटात बिअर टाकून प्यायले खासदार, VIDEO VIRAL

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत धक्कादायक घटना; बुटात बिअर टाकून प्यायले खासदार, VIDEO VIRAL

 

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. संसदेत एका खासदाराने बुटात दारु टाकून प्यायली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु असे म्हटले जाते की, बुटात बिअर टाकून पिणे हे ऑस्ट्रेलियन लोकांमध्य मद्यपा करण्याच्या परंपरेचा एक भाग आहे.
 

 
 
 
 
बुटात बिअर टाकून पिण्याचे कारण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन खासदार काइल मॅकगिन यांनी संसदेत बुटात बिअर टाकून प्यायली आहे. आज त्यांचा शेवटचा दिवस असून ही ऑस्ट्रेलियाच निरोप देण्याची अनोखी पद्धत आहे. या परंपरेला शूई असे म्हटले जाते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या परंपरेत रिटायर होणाऱ्या व्यक्तीच्या बुटात वाईन ओतून पिली जाते आणि वाईन पिल्यानंतर ओले बूट परत घालण्यासाठी दिले जातात.
'शूई' ची ही पंरपरा कधीपासून सुरु झाली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. परंतु आतापर्यंत ऑस्ट्रेलियात अनेक मशहूर आणि प्रभावशाली व्यक्तींनी ही परंपरा निभावली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ड्रायव्हर डॅनियल रिकार्डो, चित्रपच स्टार पॅट्रिक स्टीवर्ट, जिमी फॅलन, ह्यू ग्रॅंट, आणि जेरार्ड बटलर यासारख्या सिलेब्रिटींनी असे केले आहे.

 

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान ऑस्ट्रेलियन खासदार काइल मॅकगिन यांचा संसदेच शेवटचा दिवस होता. त्यांनी भाषण दिल्यानंतर संसदेत पायातून बुट काढले. त्यानंतर त्यांनी त्यात वाईन ओतली आणि बुटाने ती वाईन प्यायली. त्यानंतर त्यांनी "मला भाषण कसे संपवायचे हे लक्षात येत नव्हते. हाच एकमेव मार्ग माझ्याकडे होता. माझ्या गोल्डफिल्ड्स पक्षातील लोकांना हे नक्कीच आवडेल. मला नेहमीच ओरडा खाण्याची सवय आहे, यामुळे मी हे इथेच संपवू इच्छित आहे. दोन वर्षाच्या अद्भुत आणि रोमांचक कार्यकाळासाठी, मी मतदारांना धनव्याद देतो. चिअर्स. असे त्यांनी म्हटले आणि बुटातून बियर प्यायली." सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यात पडले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.