हुंडा की मस्करी? नवरदेवाला लग्नात पेट्रोल पंप, १३२ एकर जमीन, रोख रक्कम अन्.; व्हायरल झालेला VIDEO पाहिलात का?
भारतात हुंडाविरोधात कायदा तयार झाला असला तरीही भेटवस्तूच्या रुपात आजही हुंडा दिला जातो. आता छुप्या पद्धतीने हुंडा न देता जाहीरपणे भेटवस्तूच्या रुपाने हुंडा दिला जातो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर
व्हायरल होत आहे. यामध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल १५ कोटी रुपयांच्या
भेटवस्तू नवऱ्या मुलाला दिल्याचं स्पष्ट होतंय.
@sr_sonu_ajmer_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहसा लग्नातील सजावट आणि जेवणावळीवरून एखाद्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण हा व्हिडिओ मुलीच्या पतीला दिलेल्या भेटवस्तूंमुळे व्हायरल होत आहे. "२१….करोड… मायरा", असं या व्हिडिओला कॅप्शन दिलंय. या व्हिडिओला एका दिवसांत ५९.८ मिलिअनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
व्हिडिओमध्ये काय आहे
या व्हिडिओमध्ये एक वधू पाहुण्यांच्या गराड्यात बसली आहे. तिच्यासमोर तीन - चार पेट्या आहेत. तर एक व्यक्ती हातातील माईकवरून तिला आणि तिच्या नवऱ्याला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देतोय. या भेटवस्तूंमध्ये तीन किलो चांदी, एक पेट्रोल पंप आणि १३२ एकर जमीन, १ कोटींची रोख रक्कम देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्व भेटवस्तूंची किंमत जवळपास १५ कोटी ६५ लाख रुपये आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने अशा लग्नाची आणि अशा महागड्या भेटवस्तूंची गरज काय आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर दुसऱ्याने म्हटले आहे की हा भाट विधीचा एक भाग आहे - त्यानुसार, पारंपारिकपणे काका त्यांच्या भाची किंवा पुतण्याला त्यांच्या लग्नाच्या दिवशी भेटवस्तू देतात. "१० हजारात संपूर्ण लग्न वाजवल्याबद्दल डीजे ऑपरेटर कोपऱ्यात रडत आहे", असंही एकाने मिश्किलीत म्हटलं आहे. तर दुसऱ्याने म्हटले, "कृपया हा मूर्खपणा थांबवा".
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.