Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1959 साली 1 तोळा सोन्याची किंमत किती होती ?

1959 साली 1 तोळा सोन्याची किंमत किती होती ? 
 

गेल्या दहा पंधरा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. खरे तर ही चढ-उतार मे महिन्यापासून सुरू आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने एक नवीन उच्चांक गाठला होता. 22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत तब्बल एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. मात्र 22 तारखेला वधारलेला हा भाव जास्त काळ काही टिकला नाही. सोन्याच्या किमती पुन्हा एका लाखाच्या खाली आल्यात. दुसरीकडे गेल्या मे महिन्यात सोन्याची किंमत 99 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती मात्र किमतीने एका लाखाचा टप्पा काही क्रॉस केला नाही.

तथापि आजही 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति तोळा 97 हजार रुपयांपेक्षा अधिकच आहे. दरम्यान अशीच सारे परिस्थिती असतानाच सध्या इंटरनेटवर सोन्याच्या जुन्या बिलचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. खरेतर, 2025 मध्ये सोनं जवळपास एक लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहे. पण तुम्हाला 1959 मध्ये सोन्याची किंमत काय होती, त्यावेळी एक तोळा सोना खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागत होते ? याची माहिती आहे का ? नाही ना, मग आज आपण सोशल मीडियामध्ये 1959 मधील वायरल झालेले एका ज्वेलरी शॉपचे बिल पाहणार आहोत ज्यामध्ये एक तोळा सोन्याची किंमत नमूद आहे.

1959 मध्ये सोन्याला काय भाव मिळतं होता?
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म instagram वर सन 1959 मधील एका ज्वेलरी दुकानाच्या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे. हे जुने सोन्याचे बिल @upscworldofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे. या बिलात नमूद माहितीप्रमाणे हे बिल वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे असून, ग्राहकाचे नाव शिवलिंग आत्माराम असे आहे. यात एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 113 रुपये एवढी आहे.

म्हणजेच 66 वर्षांपूर्वी दहा ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 113 रुपये एवढी होती. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार रुपयांवर पोहोचली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. परंतु 66 वर्षांपूर्वी सोन्याची किंमत फक्त 113 रुपये प्रति तोळा एवढी होती. आणि म्हणूनच सध्या सोशल मीडियावर हे जुने बिल प्रचंड व्हायरल होत असून या बिलवर नेटकऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आणि अगदीच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.