Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, सांगलीचे दोघे जागीच ठार

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, सांगलीचे दोघे जागीच ठार
 

रत्नागिरी:  नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे दोन मोटारींच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. अनिकेत निवृत्ती एकल (वय २४) आणि राजेश गोकुळराव जाधव (२६, दोघेही रा.बजरंगनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर अनिकेत व राजेश कुपवाडच्या दिशेने येत असताना रस्त्यापलीकडे जाऊन त्यांच्या मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिली. यात दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस, तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या महादेव ॲम्बुलन्स सर्व्हिसचे महादेव वनखंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोटारीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखले केले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

मंगळवारी रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने मदत करताना अडचणी येत होत्या. दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती, की एका तरुणाचा मृतदेह मोटारीतच अडकला होता. तो काढण्यासाठी मदत करणाऱ्या पथकाला प्रयत्न करावे लागले. अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महामार्गावर वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग पोलिस प्रशासनाने केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.